26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाखलीने केली भररस्त्यात मारामारी ; चाहत्यांकडून टीका

खलीने केली भररस्त्यात मारामारी ; चाहत्यांकडून टीका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट चॅम्पियन द ग्रेट खली म्हणजेच दिलीप सिंग राणा यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हीडीओमध्ये तो टोल प्लाझा कर्मचा-यांशी भांडताना दिसला. कर्मचा-याने दावा केला आहे की त्याने खलीकडे ओळखपत्र मागितले, त्यानंतर खलीने त्याला कानाखाली मारली.

ग्रेट खली जालंधरहून कर्नालला जात असतानाची ही घटना असून फिल्लोरजवळील टोल प्लाझाचा हा व्हीडीओ असल्याचे सांगितले जात आहे. खलीने सांगितले की, एक कर्मचारी जबरदस्तीने कारमध्ये फोटो काढण्यासाठी घुसत होता. त्याला फोटो काढण्यासाठी नकार दिल्याने वाद झाला. यानंतर बाकीचे कर्मचारी आले आणि त्यांनी गाडीला घेराव घातला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

द ग्रेट खलीने निवडणूक लढवली नसली तरी तो भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. कर्मचा-याचे म्हणणे आहे की, त्याने खलीकडून फक्त ओळखपत्र मागितले. अशा प्रकारावर खलीने त्याला थप्पड मारली. व्हीडीओमध्ये कर्मचारी खलीला माकड म्हणत असल्याचे ऐकू येते. रागाच्या भरात सर्व कर्मचारी खलीला जाऊ देत नव्हते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या