18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाकेएल राहुलच्या नाबाद ९८ धावांच्या जोरावर पंजाब विजयी

केएल राहुलच्या नाबाद ९८ धावांच्या जोरावर पंजाब विजयी

एकमत ऑनलाईन

दुबई : याआधीच प्लेऑफमध्ये गेलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला पंजाब किंग्सने ६ गडी आणि ७ ओव्हर राखून मात दिली आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाबाद ९८ धावा ठोकत संघाचा विजय सोपा केला. विशेष म्हणजे या विजयामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेतही मुसंडी मारण्यात यशस्वी झाला आहे. ते गुणतालिकेत ५ व्या स्थानी पोहोचले आहेत.

चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात पंजाबने प्रथम गोलंदाजी करत चेन्नईला १३४ धावांमध्ये रोखले. त्यानंतर पंजाबने फलंदाजीला सुरुवात केली. संघाचे सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. पण कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल मात्र अखेरपर्यंत टिकून राहिला आणि त्याने नाबाद ९८ धावा ठोकत पंजाबचा विजय पक्का केला.
प्रथम फलंदाजी मिळालेल्या चेन्नईच्या संघाला फलंदाजीत साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचे बहुतेक फलंदाज सपशेल फेल होताना दिसले.

केवळ सलामीवीर फाफ डुप्लेसीसने एकहाती झुंज देत ७६ धावा कुटल्या. त्याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार खेचत ७६ धावा केल्या. त्याला इतर कोणत्याच खेळाडूची साथ न मिळाल्याने चेन्नईचा संघ केवळ १३४ धावापर्यंत मजल मारु शकला. पंजाबकडून अर्शदीप आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी २ तर शमी आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या