27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाकोहली सलामीवीर होऊ शकत नाही; वीरेंद्र सेहवाग

कोहली सलामीवीर होऊ शकत नाही; वीरेंद्र सेहवाग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने विराट कोहली सलामीवीर का होऊ शकत नाही हे स्पष्ट केले. सेहवागने काही युक्तिवाद केले आणि चाहत्यांना आठवण करून दिली की रोहित शर्मा विश्रांती घेत असल्यामुळे भारताच्या माजी कर्णधाराला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्यामुळे कोहली सलामीवीर होऊ शकत नाही असे
वीरेंद्र सेहवाग म्हणाला. तब्बल तीन वर्षांनंतर विराट कोहलीने ८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकासह, तो आता रिकी पाँटिंगच्या बरोबरीने आला आहे आणि फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आशिया कपच्या सुपर-४ फेरीत शतक झळकावले. विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन आकड्यांचा टप्पा ओलांडला आणि त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला. विराट ओपनिंगला आला आणि १२२ धावा करून नाबाद परतला. भारताने हा सामना १०१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. अशा स्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या यशानंतर डावाची सुरुवात कोहलीने करावी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड फक्त विराट कोहली मोडू शकतो हे खुद्द क्रिकेटच्या देवाने म्हणजे सचिन तेंडुलकरने सांगितले होते. विराटचा हा प्रवास गेली तीन वर्षे ७० शतकांवर रखडला होता. अखेर त्याने आपल्या ५२२ व्या डावात ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकत आपल्या शतकांच्या शतकाकडील प्रवासाला वेग दिला. जर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या ७१वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्याच्या प्रवासाची तुलना केली तर या तुलनेत विराट कोहली किंचितसा आघाडीवर असल्याचे दिसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या