22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाकोहली आदर्श खेळाडू

कोहली आदर्श खेळाडू

एकमत ऑनलाईन

कराची : पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. संपूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारणारा विराट कोहली आदर्श खेळाडू असल्याचे सना मीरने म्हटले आहे. पाकिस्तानविरोधातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने मोहम्मद रिझवानची गळाभेट घेतली होती.

तसेच बाबर आझमचेही अभिनंदन केले होते. टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. यासोबत वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात विजयी न होण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानने मोडीत काढला.
सना मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, ‘‘विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेने आपला पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचे मी कौतुक करते.

मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणे वास्तवात फार चांगले आहे’. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचा फोटो शेअर करत खेळभावनेचे कौतुक केले होते. सना मीरने पुढे म्हटले आहे की, ‘‘यामुळे त्यांच्यात असणा-या सुरक्षा भावनेचीही जाणीव होते. याचा अर्थ पुनरागमन करण्यासंबंधी त्यांना विश्वास आहे’’. भारताने एखादा मोठा विजय मिळवत पुनरागमन केले तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही असेही तिने म्हटले आहे. ‘‘जर भारताने मोठ्या विजयासोबत पुनरागमन केले तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि मला आशा आहे की स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा एकमेकांविरोधात मैदानात खेळताना दिसतील,’’ असे तिने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या