23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाडिनरला बोलवले नसल्याने कोहली रागावला

डिनरला बोलवले नसल्याने कोहली रागावला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तिस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लिश खेळाडू बेअरस्टोने या भांडणाचा खुलासा केला आहे. भांडणाचा खुलासा करताना बेअरस्टो म्हणाला, कोहलीला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले नाही, त्यामुळे तो माझ्या वर रागावला आहे.

तिस-या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर आले. खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने विराट कोहलीला प्रत्युत्तर दित त्यावर या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. विराट कोहली म्हणाला, मला काय करायचं आहे ते सांगू नकोस, तोंड बंद करून बॅटिंग कर.

कोहली आणि बेअरस्टो यांच्यातील जोरदार वाद मिटवण्यासाठी पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला. या प्रकरणाबाबत बोलताना बेअरस्टो म्हणाला, आमच्यात असं काही घडल नाही. आम्ही दोघे जवळपास १० वर्षांपासून एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. कोहलीला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण दिले नाही, त्यामुळे तो माझ्या वर रागावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या