25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeक्रीडाकोलकाताचा हैदराबादला धक्का

कोलकाताचा हैदराबादला धक्का

एकमत ऑनलाईन

चेन्नई : कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. नितीश राणाच्या ८० धावाच्या जोरावर कोलकाताने हैदराबापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादला यशस्वीपणे करता आला नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.

कोलकाताच्या १८८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात एका धावेवर जीवदान मिळाले होते. पण यााचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. वॉर्नर ३ धावांवर असताना प्रसिध कृष्णनने त्याला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाही लवकर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी डाव सारवला. जॉनीने षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतर पॅट कमिन्सने त्याला बाद केले. त्याने ४० चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटाकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली.

त्यानंतर नबीही १४ धावांवर झेलबाद झाला. दुस-या बाजूला मनीष पांडेनेही अर्धशतक झळकावले. त्यानंतरही विजय शंकर, मनीष पांडेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय शंकर रसेलला झेल देऊन परतला. त्यामुळे विजयाच्या आशा मावळल्या आणि अवघ्या १० धावांनी हैदराबादचा पराभव झाला. मनीषने नाबाद ६१ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी कोलकाताच्या सलामीवीर शुभमन गिल आणि नितीश राणाने चांगली सुरुवात करून दिली. मात्र, गिल १५ धावांवर बाद झाला. मात्र, राणाने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. तसेच राहुल त्रिपाठीनेही २८ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याला टी. नटराजनने झेलबाद केले. राणानेही ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी साकारली. त्यानंतर राणा बाद झाला आणि मॉर्गनही स्वस्तात परतला. मोहमद नबीने या दोघांना बाद केले. दिनेश कार्तिकने ९ चेंडूत २२ धावांची खेळी केली. त्यामुळे १८८ धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान हैदराबादला पेलवले नाही.

कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या