26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeक्रीडाकृणाल पांड्याला कोरोना, ८ क्रिकेटपटू संपर्कात, श्रीलंकेविरुद्धची मालिका रद्द होणार?

कृणाल पांड्याला कोरोना, ८ क्रिकेटपटू संपर्कात, श्रीलंकेविरुद्धची मालिका रद्द होणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कृणाल पांड्या हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने श्रीलंका दौ-यावर असलेल्या भारतीय संघाचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कृणालच्या संपर्कात भारताचे ८ खेळाडू संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून, त्यांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले असून, आज श्रीलंकेविरुद्ध होणारा दुसरा टी-ट्वेंटी सामना रद्द करण्यात आला आहे.

कृणालच्या संपर्कात भारताचे ८ खेळाडू आल्याची माहिती समोर आली असून, या ८ खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या दोघांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. या ८ खेळाडूंमधील काही जणांना जर कोरोनाची लागण झाली असेल तर हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. कारण एकापेक्षा जास्त खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यावर संघात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते.

भारतात जेव्हा आयपीएल सुरू झाली होती, त्यामध्येही अशीच गोष्ट घडलेली होती. आयपीएलमध्ये एकापेक्षा जास्त खेळाडू कोरोनाबाधित झाले होते आणि त्यामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेमका काय येतो, यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.

पीक नुकसानीपोटी केंद्राने दिले ७०१ कोटी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या