24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाकृष्णा सातपुतेची भारतीय टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

कृष्णा सातपुतेची भारतीय टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

एकमत ऑनलाईन

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट मधील स्टार कृष्णा सातपुतेची भारतीय टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. कृष्णा सातपुते हे मुंबईच्या टेनिस क्रिकेट वर्तुळातील एक मोठ नाव आहे. आपल्या फलंदाजीच्या बळावर कृष्णाने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत.

याच कृष्णा सातपुतेची आता भारतीय टेनिस संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. कृष्णाचा प्रवास खूपच कष्टप्रद, जिद्दीने भरलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या या मुलाची आज भारतीय संघाच कर्णधारपदी निवड झाली आहे. या खेळाडूच करावे तेवढ कौतुक कमी आहे. कृष्णा सातपुतेचा प्रवास ही एका संघर्षाची, जिद्दीची गोष्ट आहे. आई-वडिलांचे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने निधन झाल्यानंतर त्याने क्रिकेटच्या बळावर कुटुंबाचा डोलारा सावरला.

मोठ्या जिद्दीने क्रिकेटचा छंद जोपासला
आयुष्याच्या खडतर वाटेवरुन प्रवास करताना कृष्णाने मोठ्या जिद्दीने क्रिकेटचा छंद जोपासला. आज त्याची भारताच्या टेनिस संघाच्या कर्णधार पदी निवड झालीय. लहान असताना दुस-या मुलांना सोबत क्रिकेट खेळण्यासाठी बोलवताना भीती वाटायची. त्यावरुन बोलणी सुद्धा ऐकली आहेत. पण आज मी गाठलेला टप्पा पाहिल्यानंतर त्या मुलांच्या पालकांनाही अभिमान वाटतो, असे कृष्णाने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या