बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबेस्टन कसोटी सामन्यासाठी भारताचे नेतृत्व जसप्रीत बुमराहच करणार आहे. याबाबतची घोषणा बीसीसीआयने केली. भारताचा कसोटी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने तो सध्या विलगीकरणात आहे.
तेव्हापासूनच संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारताच्या गेल्या इंग्लंड दौ-यात स्थगित झालेली पाचवी कसोटी १ जुलैपासून सुरू होणार आहे.