22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्रीडा लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची पराभवाची मालिका सुरूच

लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची पराभवाची मालिका सुरूच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धेतील पराभवाची मालिका सुरूच आहे. आनंदला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या इयान नेपोमनियाची याने आनंदवर ३-२ अशा फरकाने मात केली.

आनंदने सहाव्या फेरीच्या लढतीत पहिल्या डावात बरोबरी साधून चांगली सुरुवात केली. आनंदने ५३ चालींपर्यंत झुंज दिल्याने नेपोमनियाचीला बरोबरीवर समाधान मानावे लागले. पण नेपोमनियाचीने दुसरा डाव ३४ चालीत जिंकत आघाडी घेतली. तिसºया डावात बरोबरी झाली.

पण चौथा डाव ४२ चालींत जिंकत पाच वेळच्या जगज्जेत्या आनंदने तोडीस तोड उत्तर दिले. टायब्रेकरमध्ये नेपोमनियाचीने ४१ चालींत विजय मिळवला.

Read More  वीज बिलांच्या मुद्यावर मनसे गप्प राहील अशी समजूत करुन घेऊ नये -राज ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या