31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडालुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

लुइस हॅमिल्टनची शूमाकरच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – लुइस हॅमिल्टन याने रविवारी तुर्कीश ग्रांपी स्पर्धेचे विजेतेपद मिळवत रेसिंग ट्रॅकचा बादशाह मायकेल शूमाकर याच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. लुइस हॅमिल्टन याने शूमाकरच्या सर्वाधिक सात वेळा फॉर्म्युला वन स्पर्धेचे जगज्जेतेपद जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. तुर्कीश ग्रांपी स्पर्धेचे हे त्याचे सातवे विजेतेपद ठरले. या विजेतेपदाबरोबरच त्याने 94 व्या शर्यतीत विजय मिळविला आहे.

35 वर्षीय लुइस हॅमिल्टनने नुकताच फॉम्र्युला-वनच्या इतिहासात सर्वाधिक 92 शर्यती जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. महान ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा 91 जेतेपदांचा विक्रम हॅमिल्टनने आॅक्टोबर 2020 मध्ये मोडीस काढला.शूमाकरने 14 वर्षांपूर्वी फॉम्र्युला-वन शर्यतींवर अधिराज्य गाजवले, आणि सध्या तोच कित्ता आता हॅमिल्टन गिरवत आहे. त्यामुळेच फॉम्र्युला-वनमधील या दोन महान ड्रायव्हर्समध्ये सध्या तुलना होत आहे.

दरम्यान, फॉर्म्युला वन करिअरमध्ये शूमाकरने 91 रेसेस आणि सात वेळा फॉर्म्युला वनचे जगज्जेतेपद जिंकले आहे. 44 वर्षीय शुमाकरने 2006 मध्ये निवृत्ती घेतेल्यानंतर पुन्हा 2010 मध्ये रेस ट्रॅकवर कमबॅक केले होते. परंतु कमबॅक केल्यानंतर त्याला फारसे यश न आल्यामुळे त्याने 2012 मध्ये पुन्हा फॉर्म्युला वनला अलविदा केले होते.

पंढरपुरात दररोज १ हजार भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या