24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाभारतीय फिरकीपुढे आफ्रिकन फलंदाजाचे लोटांगण

भारतीय फिरकीपुढे आफ्रिकन फलंदाजाचे लोटांगण

एकमत ऑनलाईन

टी-२० : ऋतुराज, पटेलने भारताचे आव्हान ठेवले जिवंत

विशाखापट्टनम : सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिस-या आणि निर्णायक टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले. याचबरोबर आफ्रिकेचा मालिकेवर कब्जा करण्याचा मनसुबा हाणून पाडला. भारताचे १८० धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हर्षल पटेल ४ तर युझवेंद्र चहलने ३ विकेट घेतल्या. फलंदाजीत सलामीवीर ऋतुुराज गायकवाडने ५७ तर इशान किशनने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या तिस-या सामन्यातील नाणेफेक ऋषभ पंतने पुन्हा एकदा गमावली. टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक धाव फलकावर झळकावले. यात ऋतुराजचा मोठा वाटा होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात शांत असणारी ऋतुराज गायकवाडची बॅट अखेर तिस-या आणि महत्वाच्या सामन्यात तळपली. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला १० व्या षटकात ९५ धावांपर्यंत मजल मारून दिली. अर्धशतकी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड ३५ चेंडूत ५७ धावा करून केशव महाराजच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. या पाठोपाठ आलेल्या इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. याचबरोबर भारताने ११ व्या षटकात शतकी मजल मारली.

तबरेज शमसीने श्रेयस अय्यरला १४ धावांंवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. प्रेटोरियसने ३५ चेंडूत ५४ धावा करणा-या इशान किशनला बाद केले. हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी करत २१ चेंडूत ३१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ५ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी भारताने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकन सलामीवीर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिझा हेंड्रिक्स मैदानात उतरले. आफ्रिकन कर्णधार आणि सलामीवीर टेम्बा बावुमाला अक्षर पटेलने ८ धावांवर माघारी धाडले. पावरप्लेनंतर आफ्रिकेने दोन बाद ३८ धावांपर्यंत मजल मारली. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रिझा हेंड्रिक्स २३ धावा करून बाद झाला. यजुवेंद्र चहलने रॉसी व्हॅन डेर डुसेनला यष्टीरक्षक पंत करवी अवघ्या एका धावेवर बाद केले.

यजुवेंद्र चहलने सामन्यातील दुसरा बळी मिळवत ड्वेन प्रिटोरिअसला बाद केले. चहल भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला. आफ्रिकेचा किलर फलंदाज डेव्हिड मिलरचा हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने झेल घेतला. फिरकीपटू यजुवेंद्र चहलने हेनरिक क्लासेनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत बाद केले. क्लासेन २९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीपुढे आफ्रिकन फलंदाजांना तग धरता आला नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या