26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeक्रीडालोवलिनाने केले पदक निश्चित

लोवलिनाने केले पदक निश्चित

एकमत ऑनलाईन

टोकियो : भारताची नवोदित महिला मुष्टियुद्ध खेळाडू लोवलिना बोर्गोहेनने टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत पदक निश्­िचत केले आहे.

कारकिर्दीतील प्रथमच आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची कामगिरी केलेल्या लोवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर मात केली व उपांत्य फेरी गाठली.

लोवलिनाने निन-चीनवर ४-१ अशी मात करत पदक निश्­िचत केले आहे. मुष्टियुद्धात उपांत्य फेरी गाठली की पदकाची निश्चिती होते. तिची आता उपांत्य फेरीत माजी विश्­वविजेत्या तुर्कीच्या अ‍ॅना लिसेन्कोशी लढत होईल.

जर तिने पदक पटकावले तर ती मुष्टियुद्धात अशी कामगिरी करणारी भारताची दुसरी महिला मुष्टियोद्धा बनेल. यापूर्वी सुपर मॉम मेरी कोमने २०१२ साली लंडन आॅलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळवले होते.

जळकोट तालुका तापीच्या आजाराने फणफणला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या