21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडालवप्रीत सिंहने जिंकले कांस्यपदक; वेटलिफ्टिंगमध्ये पदकांचा धडाका कायम

लवप्रीत सिंहने जिंकले कांस्यपदक; वेटलिफ्टिंगमध्ये पदकांचा धडाका कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय लवप्रीत सिंहने पुरुष १०९ किलोग्रॅम वजनी गटात देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतने स्नॅचमध्ये १६३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो असे एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले आहे.

लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकसंख्या १४ वर पोहोचली आहे. लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या १०९ किलोग्रॅम वजनी गटात चांगली कामगिरी केली.

स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने १५७ किलो वजन उचलले. त्यानंतर दुस-या प्रयत्नात १६१ आणि तिस-या प्रयत्नात १६३ किलो वजन उचलले. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात १८५ किलोग्रॅम वजन उचलले. त्यानंतर दुस-या प्रयत्नात १८९ आणि तिस-या प्रयत्नात १९२ किलोग्रॅम वजन उचलले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या