28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अखिल भारतीय हापकिडो बॉक्सिंग महासंघ आयोजित पहिल्या दोन दिवशीय राष्ट्रीय करंडक २०२२ स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम, उत्तर प्रदेश द्विवतीय तर नवी दिल्ली संघाने तृतीय क्रंमाक पटकावला आहे.

दिल्लीतील संतनगरमधील अपेक्स पब्लिक स्कूल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, पाँडेंचेरी, दिल्ली आदी आठ राज्यांतील २५५ खेळाडूंनी सहभाग घेतला. हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेतील सर्व पारितोषिके स्थानिक आ. संजीव झा यांच्या हस्ते देण्यात आली.

यात दिल्ली राज्याला ३ सुवर्ण, ५ रौप्य, ३ कांस्य असे एकूण ३६ गुण मिळाले. उत्तर प्रदेश राज्याला ८ सुवर्ण, ६ रौप्य ४ कांस्य असे एकूण ६६ गुण, तर महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक ३९ सुवर्ण, १९ रौप्य, १३ कांस्य असे एकूण २७८ गुण मिळाले. यावेळी अ. भा. हापकिडो बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष यु. नटराजन, सरचिटणीस राज वागदकर, कार्याध्यक्ष रविंद्र चोथवे, उपाध्यक्ष प्रभाकर ढगे, दिल्ली हापकिडो बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस दीपक सक्सेना आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या