व्हीडिओ पाहून अनेकांना पावसात भिजण्याचा मोह आवरता येणार नाही
मुबंई : पाऊस म्हटलं की त्या पावसासोबत येणारा वारा, आकाशात एकत्र येणारे ते काळे ढग, पक्ष्यांची घरटयात जाण्यासाठी असणारी लगबग असं सगळं प्रसन्न वातावरण असतं. पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा उन्हाने तापलेल्या जमिनीवर पडतो तेव्हा येणारा मृद्गंध तर काय वणार्वा! हातातील सगळी कामं टाकून त्या पावसात मनमुराद भिजायचं. पावसाचे ते टपोरे थेंब अंगाला टोचत असले तर ते झेलून त्याचा आनंद घ्यायचा. मातीचा सुगंध दरवळत असताना मित्रांबरोबर त्या पावसात नाचायचं.
आपल्यातील प्रत्येकाला हा पाऊस कधी ना कधी अनुभवायला मिळतोच. हा आनंद प्रत्येकजण अनुभवत असतो. भारताचे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सुद्धा यामध्ये मागे नाहीत. त्यांनी एक व्हीडीओ शेअर करून आपला पावसात भिजण्याचा आनंद पूर्णपणे व्यक्त केला आहे. ते मस्तपैकी पावसात भिजून आनंद घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षिततेसाठी बाहेर पडता येत नसले तरी पावसाचा आनंद मात्र कसाही घेता येईल असेच दिसत आहे. हा व्हीडीओ अनेकांनी पाहिला आहे. व्हीडिओ पाहून अनेकांना पावसात भिजण्याचा मोह आवरता येणार नाही हे मात्र नक्की.
Read More आता नोटाही सॅनिटाईझ केल्याने होतील सुरक्षित