26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडा‘मास्टरकार्ड’ टीम इंडियाचा नवा टायटल स्पॉन्सर

‘मास्टरकार्ड’ टीम इंडियाचा नवा टायटल स्पॉन्सर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघ देशात कोणतीही मालिका खेळेल, तिच्या प्रायोजकत्वावर ढं८ळट जाहिरात नसणार आहे. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने बीसीसीआय सोबतचा करार वेळेआधीच तोडला आहे. आता बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर पेटीएम ची जागा मास्टरकाडने घेतली आहे. आता भारतात होणा-या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टायटल स्पॉन्सर फक्त मास्टरकार्ड असेल.

बीसीसीआयने २०१९ मध्ये पेटीएम सोबत टायटस प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते, त्यानंतर एका सामन्यासाठी ३.८० कोटी रुपयांचा सौदा निश्चित करण्यात आला, त्यापूर्वी ही रक्कम २.४ कोटी रुपये होती, परंतु २०२२मध्येच पेटीएमने हा करार तोडला.

भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा संपवून झिम्बाब्वेला जाणार आहे. येथे टीम इंडिया १८ ते २२ ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. देशांतर्गत दौ-यावर मास्टरकार्डच शीर्षक प्रायोजक असेल.

पेटीएमने जुलैच्या सुरुवातीला बीसीसीआयला सांगितले होते की, यापुढे त्यांच्या सामन्यांचे शीर्षक प्रायोजक म्हणून चालू ठेवू इच्छित नाहीत आणि त्यांनी मास्टरकार्डकडे अधिकार सोपवण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पेटीएमसोबत झालेल्या कराराच्या आधारे हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. आता मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी ३.८ कोटी रुपये देणार आहे.

पेटीएमने यापूर्वी २०२३ पर्यंत बीसीसीआयकडून हे हक्क विकत घेतले होते. मात्र आता ते वेगळे झाले असून आता २०२३ पर्यंत हे अधिकार मास्टरकार्डकडे सुपूर्द केले जातील. २०१९ मध्ये, पेटीएमने प्रति सामना ३२६.८० कोटी रुपयांचा हा करार केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या