23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडापाक संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी मॅथ्यू हेडन

पाक संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी मॅथ्यू हेडन

एकमत ऑनलाईन

कराची: मागील ४-५ दिवसांत पाकिस्तान क्रिकेटमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताच मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल-हक आणि गोलंदाज प्रशिक्षक वकार युनिस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पण, आजचा दिवस हा पाकिस्तान क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी अखेर माजी खेळाडू रमीज राजा यांनी अधिकृत निवड झाली. १९९२च्या वर्ल्ड कप विजेत्या पाकिस्तानच्या संघाचे सदस्य असलेले राजा हे पीसीबीचे ३६ वे अध्यक्ष आहेत.

जमैकात क्वारंटाईन कालावधीत मी मागील २४ महिन्यांचा आढावा घेतला आणि त्यावेळी हे बायो-बबलचे सत्र असेच सुरू राहणार असल्याचे मला जाणवले. त्यामुळे मला कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही, त्यांना वेळ देता यावा याकरिता मी राजीनामा देत आहे,असे मिसबाह उल हकने सांगितले होते.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन याची निवड झाली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज वेर्नोन फिलेंडर गोलंदाज प्रशिक्षक असणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत या अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन पाकिस्तान संघाला मिळणार असल्याचे त्यांचे चाहते खूश झाले आहेत.
हेडन यांची कारकीर्द

हेडनने १०३ कसोटी, १६१ वन डे व ९ ट्वेंटी-२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं कसोटीत ८६२५ ( ३० शतके व २९ अर्धशतके) धावा, वन डेत ६१३३ ( १० शतके व ३६ अर्धशतके) धावा केल्या आहेत. फिलेंडरनं दक्षिण आफ्रिकेकडून ६४ कसोटीत १७७९ धावा व २२४ विकेट्स घेतल्या आहेत. ३० वन डेत ४१ विकेट्स व ७ ट्वेंटी-२०त ४ विकेट्स घेतल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या