25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeक्रीडामेदवेदेव पॅरीस मास्टर्सचा जेता

मेदवेदेव पॅरीस मास्टर्सचा जेता

एकमत ऑनलाईन

मास्को : तिस-या सीडेड रशियाच्या डॅनील मेदवेदेव याने रविवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत जर्मनीच्या अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याला तीन सेटमध्ये पराभूत करीत पॅरीस मास्टर्स स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली.

डॅनील मेदवेदेव याने अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेवचे कडवे आव्हान 5-7, 6-4, 6-1 अशा फरकाने परतवून लावत झळाळता करंडक पटकावला. या मोसमातील त्याचे हे पहिलेच जेतेपद ठरले. तसेच टेनिस कारकीर्दीत त्याने आठ स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला आहे.

डॅनील मेदवेदेव व अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींमध्ये जर्मनीच्या खेळाडूचे वर्चस्व होते. अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याने पाच तर डॅनील मेदवेदेव याने दोन लढती जिंकल्या आहेत. मात्र या पराभवामुळे अ‍ॅलेक्झॅण्डर झ्वेरेव याचे सलग तिसरे जेतेपद पटकावण्याच्या स्वप्न अधुरेच राहिले. तसेच सलग १२ लढतींनंतर त्याची विजयी घोडदौडही थांबली.

गोस्वामींची तुलना केली चक्क महात्मा गांधींशी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या