23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडामेस्सीची हॅट्ट्रिक

मेस्सीची हॅट्ट्रिक

एकमत ऑनलाईन

ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी याने विश्वचषक पात्रता फेरीत बोलेव्हियाविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवीत अर्जेंटिनाला ३-० असा विजय मिळवून दिला शिवाय ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमदेखील मोडीत काढला.

दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात ३४ वर्षांचा मेस्सी सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला. मेस्सीच्या नावे ७९ गोल्सची नोंद झाली आहे. ७७ गोल्ससह पेले सर्वाधिक गोल्स करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते. पेले यांनी अखेरचा सामना जुलै १९७१ ला खेळला होता.

सध्या ते पोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे इस्पितळात आहेत. मेस्सीने सामन्याच्या १४ व्या, ६४ व्या आणि ८८ व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनाकडून १५३ वा सामना खेळताना मेस्सीने पहिला गोल करीत पेले यांच्या सर्वाधिक गोल्सची बरोबरी केली. यानंतर मार्टिनेजने केलेल्या पासवर गोल करत मेस्सीने पेले यांचे रेकॉर्ड मोडत नवा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्ट्रिक करण्याची मेस्सीची ही सातवी वेळ आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या