21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेत ‘मिनी आयपीएल’

दक्षिण आफ्रिकेत ‘मिनी आयपीएल’

एकमत ऑनलाईन

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी येथे खेळून पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिका लवकरच टी-२० लीग सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, त्यांचे संघ इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. या मिनी आयपीएलला यशस्वी करण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रॅमी स्मिथकडे देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक अंबानी, एन. श्रीनिवासन यांची चेन्नई सुपरकिंग्ज, पार्थ जिंदल यांची दिल्ली कॅपिटल्स, मारन यांची सनरायझर्स हैदराबाद, संजीव गोयंका यांची लखनौ सुपर जायंट्स आणि मनोज बदाले यांच्या राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझींनी आफ्रिकेच्या मिनी आयपीएलमधील संघ खरेदी करण्यास पसंती दिली आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीने सर्वाधिक आर्थिक बोली लावली आहे, ज्याची रक्कम जवळपास २५० कोटींच्या घरात गेली आहे. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक फ्रँचायझीला १० वर्षांसाठी फ्रँचायझी फीच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल. मुंबई इंडियन्सने केपटाऊनमध्ये आपला संघ बनवण्यास पसंती दिली आहे. चेन्नईच्या फ्रँचायझीला जोहान्सबर्ग येथील फ्रँचायझी मिळण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या