25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडामीराबाई चानूने इतिहास रचला

मीराबाई चानूने इतिहास रचला

एकमत ऑनलाईन

टोकियो : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक जिंकून दिले. ४९ किलो वजनी गटात तिने ऐतिहासिक कामगिरीसह रौप्य पदकाची कमाई केली. वेट लिफ्टिंग प्रकारात २१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. चानूने क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो आणि स्रॅचमध्ये ८७ किलो असे कुल २०२ किलो वजन उचलत चंदेरी कामगिरी नोंदवली.

यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. चीनच्या होऊ झिऊईने कुल २१० किलो (स्रॅच ९४ किलो, क्लीन आणि जर्क ११६ किलो) वजनासह सुवर्ण पदक पटकावले. इंडोनेशियाची ऐसाह विंडी कांटिकाने कुल १९४ किलोसह कांस्य पदकावर नाव कोरले. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूची कामगिरी निराशजनक राहिली होती. त्यानंतर तिने सातत्याने कामगिरीत सुधारणा केली.

२०१७ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत चानूने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २६ वर्षीय चानूने मागील ऑलिम्पिकमधील उणीवा दूर करुन भारताचे पदतालिकेचे खाते उघडले. आपल्या खेळात टेक्निकलीदृष्ट्या बदल करत चानूने दमदार कामगिरी करुन दाखवली. १ मे पासून स्ट्रेंथ आणि कंडीशंिनग ट्रेनिंगसाठी ती अमेरिकेला गेली होती. खांद्याच्या दुखापतीवरील उपचारानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी केली आहे.

टोकियोत ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा थाटात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या