23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडामीराबाई चानू बनणार आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक

मीराबाई चानू बनणार आता अतिरिक्त पोलिस अधीक्षक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मिराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. तिने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. या कामगिरीनंतर मिराबाईवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्यासाठी आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. तिला नव्या नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचेही सांगितले होते. मिराबाई आता मणिपूरच्या पोलिस विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम करणार आहे.

मणिपूर सरकारने मिराबाईला हे पद दिले आहे. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेह-यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन ऍण्ड जर्क प्रकारात वजन उचलले. त्यामुळे तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान, मीराबाई चानू टोकियोहून आज भारतात परतली. दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळ कर्मचा-यांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. गार्ड ऑफ ऑनरदेखील दिला. या दरम्यान मीराची आरटी-पीसीआर चाचणीही घेण्यात आली. तिचे प्रशिक्षक विजय शर्माही मीरासोबत परत आले आहेत.

मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टिंगमधील दुसरे पदक
वेटलिफ्टर मीराबाई चानूने शनिवारी एकूण २०२ किलो वजन उचलून महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीरा ही भारताची दुसरी अ‍ॅथलिट आहे. यापूर्वी २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. मीराबाई चानूने टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते पहिल्याच दिवशी उघडून देशाची मान उंचावली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा सुरळीत करा, रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या