27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडामिचेलच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने

मिचेलच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना ‘ट्रेंट ब्रिज’ येथे खेळला जात आहे. सामन्यात पहिल्या दिवशी न्यूझिलंडने ४ गडी गमावून ३१८ धावा केल्या. डॅरिल मिशेल नाबाद ८१ आणि टॉम ब्लंडल ६७ धावांवर खेळत आहेत. कसोटी सामन्यात किवी फलंदाज मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहेत. पहिल्या दिवशी किवी फलंदाजांची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली, तर दुस-या दिवशी असे काही घडले ज्याने बरीच चर्चा झाली. या कसोटी सामन्यात असे काही घडले की, ते पाहून चाहते वेडे झाले आहेत.

किवीच्या इनिंग दरम्यान मिशेलने मारलेला एक षटकार सरळ जाऊन गॅलरीत बसलेल्या एका महिला चाहत्याच्या बीअरच्या ग्लासमध्ये पडला, त्यामुळे महिलेला धक्का बसला आणि तिच्या हातातील बीअरचा ग्लास खाली पडला. हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर किवी संघाने त्या महिला चाहत्यासाठी असे काही केले ज्याची आता अधिक चर्चा होत आहे. किवी टीमने महिला फॅनला बीअरचा दुसरा ग्लास दिला. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किवी संघाच्या या खेळीने चाहत्यांचीही मने जिंकली आहेत.

ट्रेंटब्रिज कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळण्यासाठी उतरलेल्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार लॅथमला केवळ २६ धावा करता आल्या. विल यंगने ४७ आणि कॉनवेने ४६ धावा केल्या मात्र नंतर मिचेल आणि ब्लंडेल यांनी अर्धशतके झळकावत किवी संघाचा डाव ताब्यात घेतला. आत्तापर्यंत जेम्स अँडरसनने २ आणि स्टोक्सने २ बळी घेतले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या