26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeक्रीडामोदी स्टेडियममध्ये मोदी?

मोदी स्टेडियममध्ये मोदी?

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलमधील नवखा संघ गुजरात टायटन्स आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएल फायनल खेळणार आहे. रविवारी (२९ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो भिडणार आहे. गुजरात आपल्या होम ग्राऊंडवर तब्बल १ लाख ३० प्रेक्षकांच्या समोर आपली पहिलीवहिली आयपीएल फायनल खेळेल. विशेष म्हणजे हा फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मैदानात हजेरी लावणार आहेत.

हा फायनल सामना खेळवण्यापूर्वी सांगता सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा आयपीएलचा सांगता समारंभ हा भारताच्या स्वातंत्र्याला ७५वर्षे पूर्ण होत आहेत त्यावर आधारलेला असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मैदानामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फायनल स्पर्धेपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. तर गृहमंत्री शहा गुजरात दौ-यावरच आहेत. अशातच हे दोघे आयपीएल फायनलला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार ते रविवार अहमदाबादमध्ये राजकीय आणि क्रीडा कार्यक्रम आहेत. अशा स्थितीत ६,००० हून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने राज्य राखीव पोलिस (एसआरपी), जलद कृति दल (आरएएफ) आणि इतर एजन्सींनाही सुरक्षा व्यवस्थेसाठी सामील केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या