29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्रीडामोहम्मद शामीची कोरोनावर मात

मोहम्मद शामीची कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी कोरोनामुक्त झाला आहे. स्वत: मोहम्मद शामीने कोरोनावर मात केल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

कोरोनाची लागण झाल्याने मोहम्मद शामीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेला मुकावे लागले होते.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतूनही त्याला बाहेर पडावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत शामीऐवजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या