16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडासर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलने केला संघ जाहीर

सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलने केला संघ जाहीर

एकमत ऑनलाईन

– डेनियल एल्व्सला संधी, तर फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती
नवी दिल्ली : कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता प्रत्येक देश आपापला संघ जाहीर करताना दिसत आहेत

. दरम्यान सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलनेही आपला संघ घोषित केला आहे. सोमवारी ब्राझीलने आपल्या २६ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये ३९ वर्षीय डेनियल एल्व्सला संधी दिली आहे. तर फर्मिनो, कोटिन्होसारखे स्टार खेळाडू नसल्याचेही दिसून आले आहे.

अ‍ॅस्टन व्हिलाचा स्टार स्ट्रायकर फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे संघात नसून दुसरीकडे, विंची, गॅब्रिएल, पेड्रो या युवा वेगवान फॉरवर्ड खेळाडूंना स्थान दिल्याने लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड फर्मिनोला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. ब्राझीलच्या २६ जणांच्या संघात १२ खेळाडू इंग्लिश प्रीमियर लीग खेळणार आहेत. दरम्यान ब्राझील २४ नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळेल त्यानंतर स्वित्झर्लंड आणि कॅमेरूनबरोबरही त्यांचे सामने असतील.

ब्राझीलचा संघ
गोलकिपर : एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास)
डिफेन्डर : ब्रेमर (जुव्हेंट्स), अ‍ॅलेक्स सँड्रो (जुव्हेंट्स), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (जुव्हेंट्स), डॅनियल अल्वेस (पुमास), अ‍ॅलेक्स टेलेस (सेव्हिला)

मिडफिल्डर : ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम)
फॉरवर्डस् : अँटोनी (मँचेस्टर युनायटेड), गॅब्रिएल जीसस (आर्सनल), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), नेमार ज्यू. (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेंगो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिअल माद्रिद), विंची ज्युनियर (रिअल माद्रिद)

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या