मुंबई : रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने उत्तराखंडचा ७२५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. मुंबईने या सामन्यात उत्तराखंडला ७९५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात उत्तराखंडचा संघ दुस-या डावात केवळ ६९ धावा करू शकला.
न्यू साउथ वेल्सने यापूर्वी १९२९-३० मध्ये क्वीन्सलँडवर ६८५ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. मुंबईने तब्बल ९३ वर्षांनंतर हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय बंगालच्या नावावर होता. १९५३-५४ मध्ये ओडिशाचा ५४० धावांनी पराभव केला होता.