36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडामुंबईला दणका, केकेआर विजयी

मुंबईला दणका, केकेआर विजयी

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईवर ५२ धावांनी विजय साकारत दोन गुण पटकावले. पण या गुणांसह केकेआरच्या संघाने तीन मोठे धक्के दिले. यामुळे आता गुणतालिकेत मोठा उटलफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
केकेआरने आजच्या करो या मरो सामन्यात मोठा विजय साकारला.

गेल्या सामन्यात केकेआरला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यापूर्वी केकेआरच्या खात्यात आठ गुण होते आणि त्यांची नवव्या स्थानावर घसरण झाली होती. पण आजच्या सामन्यात केकेआरने मोठा विजय साकारला आणि त्यांनी आपल्या रनरेटमध्ये चांगली वाढ केली. या एका गोष्टीचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. कारण या विजयानंतर केकेआरच्या खात्यात १२ सामने जमा आहे. या १२ सामन्यांमध्ये केकेआरने पाच लढतींमध्ये विजय साकारले आहेत आणि त्यांना सात पराभव स्विकारावे लागले आहेत. त्यामुळे आता पाच विजयासह केकेआरचे १० गुण झाले आहेत.

गुणतालिकेत आता केकेआरबरोबर पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचेही १० गुण झाले आहेत. पण रनरेटच्या जोरावर केकेआरने आता तीन संघांना धक्के दिले आहेत. केकेआरने या सामन्यात मुंबईला पराभूत केले. त्यानंतर गुणतालिकेत त्यांनी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना पिछाडीवर टाकत मोठा उलटफेर केला आहे.

कारण केकेआरचा संघ आता नवव्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर गेला असून त्यांनी दोन स्थानांची झेप घेतली आहे. आता केकेआरचे या आयपीएलमधील दोन सामने शिल्लक आहेत. या दोन सामन्यांमध्ये केकेआरने विजय साकारला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात आणि त्यांच्यासाठी प्ले ऑफचे दार उघडू शकते. पण केकेआरला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील.

पहिली गोष्ट म्हणजे आता उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये केकेआरला मोठे विजय मिळवून १४ गुणांसह रनरेटही वाढवावा लागणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अन्य शर्यतीत असलेल्या संघांच्या पराभवाची वाट त्यांना पाहावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या