25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचा हैदराबादवर १३ धावांनी विजय

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर १३ धावांनी विजय

एकमत ऑनलाईन

चेन्नई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने चेन्नईत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे. चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या सन्मानजनक धावसंख्येचा बचाव करत त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवला. हैदराबादचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकात ५ बाद १५० धावा केल्या.

मु्ंबईकडून रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक आणि कायरन पोलार्ड यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर या सलामी जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत हैदराबादचा डाव १३७ धावांवर संपुष्टात आणला.

अपु-या आरोग्य सोयी-सुविधांचे आव्हान; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला नवा अ‍ॅक्शन प्लॅन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या