18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडामुंबई जिंकली, पण प्लेऑफची संधी हुकली

मुंबई जिंकली, पण प्लेऑफची संधी हुकली

एकमत ऑनलाईन

अबुधाबी : आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी चांगलीच रंगत झाली. पंजाब आणि राजस्थान बाहेर गेल्यानंतर मुंबई आणि कोलकातामध्ये चढाओढ सुरू होती. मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पदरी निराशा आली. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांचे प्रयत्न अपुरे पडले. हैदराबादचा संघ पराभूत झाला. मात्र मुंबईला धावगती वाढवण्यात अपयश आले. हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या समीकरणामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये वर्णी लागली आहे. दरम्यान, आयपीएलच्या १४ व्या हंगामातील अखेरच्या साखळी लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ४२ धावांनी पराभव केला.

सर्वात प्रथम नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागल्याने आशा जिवंत झाल्या. त्यात आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा १८ धावा करून बाद झाला. मात्र, इशान किशनने आक्रमक खेळी केली. इशानने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने १६ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. इशान किशन ३२ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. इशाननंतर सूर्यकुमार यादवने मोर्चा सांभाळला. दुस-ा बाजूने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या अपयशी ठरले असले तरी, सूर्यकुमारने धावगती वाढवली.

१७ व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात सूर्यकुमारला फसवले. सूर्याने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात होल्डरने फक्त ५ धावा दिल्यामुळे मुंबईला अडीचशेचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या. होल्डरने ४ बळी घेतले. या धावसंंख्येसह मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. पण इतके करूनही हैदराबादला कमी धावांवर रोखता आले नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या