25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडामुंबईचा पहिला विजय

मुंबईचा पहिला विजय

एकमत ऑनलाईन

चेन्नई : येथील चेपॉक मैदानावर आज खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मॉर्गनने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. अचूक रणनितीमुळे कोलकाताने मुंबई इंडियन्सला २० षटकात १५२ धावांवर सर्वबाद केले. रसेलने १८ व्या षटकात गोलंदाजीला येत २ षटकात १५ धावा देत ५ बळी घेतले. त्यामुळे मुंबई बॅकफुटवर गेली होती. मात्र, छोटे आव्हान असतानाही मुंबईने कअऋेलकाताला धक्का दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्याने कोलकाताने हा सामना गमावला. मुंबईकडून राहुल चहरने ४ बळी घेत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डी कॉकला संधीचे सोने करता आले नाही. त्याला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. पहिल्या धक्क्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळले. त्याने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ४२ धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारने आक्रमक पवित्रा धारण करत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान त्याने रोहितसोबत ३३ चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली.

सूर्यकुमारने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर मुंबईला आपली धावगती वाढवता आली नाही. संयमी खेळी करणारा रोहितही वैयक्तिक ४३ धावांवर माघारी परतला. कमिन्सने त्याला बोल्ड केले. सूर्यकुमार-रोहितच्या विकेटनंतर कोलकाताने सामन्यावर नियंत्रण मिळवले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. १८ व्या षटकात मॉर्गनने अष्टपलू खेळाडू आंद्रे रसेलच्या हातात चेंडू सोपवला. रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. रसेलव्यतिरिक्त पॅट कमिन्सने २ बळी घेतले. त्यानंतर मुंबईनेही जोरदार धक्के देत १० धावांनी कोलकाताला धूळ चारली.

सचिन वाझेला सेवेतून काढण्याच्या प्रक्रियेला वेग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या