17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeक्रीडामुंबईचा जेतेपदाचा पंचकार तर रोहितचा षटकार

मुंबईचा जेतेपदाचा पंचकार तर रोहितचा षटकार

एकमत ऑनलाईन

दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत आली आणि त्यामुळे दिल्ली विजेतेपद मिळवणार काय यावर क्रिकेटरसिकांना फार आतुरता लागून होती पण दिल्लीच्या गोलंदाजांना मुंबईला १५६ धावात रोखणे हे काही जमले नाही मुंबईचा संघ तिनी क्षेत्रात उत्कृष्ट होता त्यांनी कामगिरीही उत्कृष्ट केली महत्त्वाचं म्हणजे नाणेफेकीचा कौल रोहित विरुद्ध गेला हे बरं झालं त्यामुळे त्याला फिल्डिंग घ्यायची की बॅटिंग यावर निर्णय घ्यावा लागला नाही. श्रेयस अय्यर मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर वन मध्ये धावांचा पाठलाग करताना पराभव झाला होता म्हणून यावेळी त्याने तणावमुक्त धावां उभ्या कराव्यात असे ठरवले पण यावेळी या निर्णयाचा फायदा दिल्ली संघ उठवू शकला नाही पहिल्याच चेंडूवर मार्क स्टाँयनिसचा यष्टी मागे झेल गेला प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ७ बाद १५६ धावांचीच मजल मारता आली.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांची अर्धशतकी खेळी वगळता त्यांच्या डावात वेगळे असे काहीच घडले नाही मुंबईची ताकद आणि सामन्याचा निर्णय हा टी २०च्या ट्रेंडप्रमाणे पॉवर प्लेमध्येच दिसून आला. दिल्लीच्या पॉवर प्लेमध्ये मुंबईने त्यांचे तीन गडी टिपले. केवळ ४१ धावांत. पहिल्या चेंडूवर मार्क्स स्टॉइनिस नंतर अजिंक्य रहाणे आणि जीवदान मिळाल्यानंतरही शिखर धवन यांना दिल्लीने पॉवर प्लेमध्ये गमावले. दिल्लीच्या आव्हानातील हवा खरे तर त्याच वेळी निघून गेली होती. बोल्टचा (३०धावात ३)तिखट मारा दिल्लीसाठी मारक ठरला. श्रेयस अय्यर चौदावर असताना कुल्टरनाईल च्या गोलंदाजीवर कव्हर मध्ये ईशान किशनने संधी दिली नाहीतर दिल्लीच (३ बाद ३५)काही खर नव्हत अय्यर आणि रिषभ पंत यांची भागीदारी झाली नसती, तर कदाचित दिल्लीला शंभरी देखील गाठता आली नसती.

पंतने ३८ चेंडूत ५६, तर श्रेयस अय्यरने ५० चेंडूंत ६५ धावांची खेळी केली. या दोघांच्या ९६ धावांंच्या भागीदारीमुळेच दिल्लीचे किमान आव्हान उभे राहू शकले. बूमराह अंतिम सामन्यात एक सुद्धा विकेट घेऊ शकला नाही पण नॅथन कुल्टरनाईलने मात्र दोन गडी बाद केले तुलनेत मुंबईने आपल्या पॉवर प्लेमध्ये केवळ एक विकेट गमावताना ६१ धावांची टोलेबाजी केली. निर्णयाच्या दृष्टिने येथेच सामना संपला होता. सूर्यकुमारनेही आपल्या कर्णधाराला उत्तम साथ देत सामन्यावर मुंबईचं वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. रोहित शर्मा अंतिम सामन्यात चांगल्या फॉर्मात फटकेबाजी करत होता. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित आणि सूर्यकुमारमध्ये गोंधळ निर्माण झाला. रोहित नॉन स्ट्राईक एंडपर्यंत पोहचल्यावर त्याची विकेट धोक्यात असल्याचं लक्षात येताच सूर्यकुमारने स्वतःच्या विकेटवर पाणी सोडत रोहितला वाचवलं.

मात्र, विजयी क्षण प्रत्यक्षात येई पर्यंत मुंबईने विजयासाठी २० धावांची आवश्यकता असताना नाहक तीन गडी गमावले. रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या असे तीन फलंदाज त्यांनी गमावले. हार्दिक तर विजयासाठी एक धाव आवश्यक असताना बाद झाला. रोहितने ५१ चेंडूंत ६८ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर इशानने नाबाद ३३ धावा १९ चेंडूंतच फटकावल्या. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. अचूक गोलंदाजीनंतर कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सला हरवले. या वेळी अंतिम सामना त्यांनी पाच गडी राखून जिंकला आणि पाचव्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबईने १८.४ षटकांत ५ बाद १५७ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि त्याला इशान किशनच्या फटकेबाजीचा तडका मिळाला. मुंबईने या स्पर्धेतील चारही सामन्यात दिल्लीला हरवण्याचा पराक्रम केला. पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच गडी राखून पराभव केला दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट ने तर तिसऱ्या सामन्यात सत्तावन्न धावांनी पराभव केला होता

रोहितचे सहावे विजेतेपद
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाचव्यांदा विजेतेपद मिळविले. रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड हे मुंबईच्या पाचही विजेतेपदाचे साक्षीदार राहिले. विशेष म्हणजे रोहितसाठी हे सहावे विजेतेपद .. मुंबई इंडियन्सकडून त्याची पाच विजेतीपदे आहेत. अन्य एक विजेतेपद त्याने डेक्कन चार्जर्सकडून २००९ मध्ये खेळताना मिळविले होते. हे आयपीएलचे दुसरे पर्व होते आणि स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती.

अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या