24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडामुशफिकुर रहीमची टी २० मधून निवृत्ती

मुशफिकुर रहीमची टी २० मधून निवृत्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रहीमनं बांग्लादेशसाठी १०२ सामने खेळले आहेत. मुशफिकुर रहीमनं संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगिरी केली होती. मात्र आशिया कपमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आली नाही.

बांग्लादेशला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं सुपर फोरमध्ये संघ पोहोचू शकला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याला केवळ एक धाव करता आली होती तर श्रीलंकेविरुद्ध त्यानं केवळ चार धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये बांग्लादेशचा पराभव झाल्यानं आशिया कपमधून त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम म्हणजे संघातील आक्रमक खेळाडू. त्याने आतापर्यंत १०२ टी२० सामने खेळले १५०० धावा त्याने केल्या असून ७२हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या