26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeक्रीडामेरी कोम पराभूत

मेरी कोम पराभूत

एकमत ऑनलाईन

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा गुरुवार दि. २९ सातवा दिवस आहे. आज भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोम राउंड ऑफ १६ मध्ये कोलंबियाची बॉक्सर इंग्रीट वलेन्सिया हिला भीडली. मात्र या सामान्यात मेरीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. कोलंबियाच्या वलेन्सियाने मेरीचा ३-२ असा पराभव केला. मेरीच्या या पराभवामुळे भारतीय क्रीडा चाहते नाराज झाल्याचे चित्र आहे.

तत्पूर्वी, ऑलिम्पिकच्या सलामीच्या सामन्यात मेरी कोमने शानदार विजय मिळवला होता. राउंड ऑफ ३२ च्या सामन्यात ६ वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली डॉमिनिक रिपब्लिकची महिला बॉक्सर मिग्यूलिना हिला नमवत मेरीने आपला पहिला विजय मिळवला. मेरीने महिलांच्या ५१ किलोग्राम वजनी गटात हा सामना ४-१ च्या फरकाने जिंकला.

दरम्यान, ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी चांगला ठरला. आघाडीची बॅडमिंटनपूट पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्वर दोन सेटमध्ये सरळ मात करत सिंधूने बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम ठेवली. अवघ्या ४१ मिनीटांत संपलेल्या या सामन्यात सिंधूने २१-१५, २१-१३ अशी बाजी मारली. आगामी फेरीत सिंधूसमोर प्रतिस्पर्धीचे मोठे आव्हान असेल. जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाच्या किम गेउन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी सिंधूला दोन हात करायचे आहेत.

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या