24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडानमन ओझाच्या वडिलांना अटक

नमन ओझाच्या वडिलांना अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना सोमवारी मध्यप्रदेशातील मुलताई पोलिसांनी गंडा घालण्याच्या प्रकरणात अटक केली.

पोलिसांनी विनयओझा यांना कोर्टात हजर केले, कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमन ओझा हा देखील पोलिस ठाण्यात हजर होता आणि वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याला जामीन मिळवण्यात यश आले नाही.

वास्तविक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत २०१३ साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २०१४ मध्ये तत्कालीन व्यवस्थापक नमनचे वडील विनय ओझा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून व्हीके ओझा फरार होते, ज्यांचा पोलीस ८ वर्षांपासून शोध घेत होते.

नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनच्या कसोटीत ५६ धावा, एकदिवसीय सामन्यात एक धाव आणि टी २० मध्ये १२ धावा आहेत. त्याने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या