29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्रीडानसीम शाह रुग्णालयात दाखल; ऊर्वशी रौतेलावर दु:खाचा डोंगर

नसीम शाह रुग्णालयात दाखल; ऊर्वशी रौतेलावर दु:खाचा डोंगर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पाचवा सामना आज बुधवारी लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी पाक संघाला मोठा धक्का बसला आहे. ऊर्वशी रौतेलाचा क्रश वेगवान गोलंदाज नसीम शाहला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार नसीमला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. काही दिवसांपासून त्याला खूप ताप आला होता.

मीडिया रिपोर्टस्नुसार नसीमला दोन दिवसांपासून ताप होता. त्यांच्या तापाचे कारण छातीत इन्फेक्शन आहे. लाहोर येथील रुग्णालयात त्याला मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. नसीमला खूप अशक्तपणा जाणवत होता. काल दिवसभर तो त्याच्या खोलीतच राहिला आणि कुठेही बाहेर आला नाही.

टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर पडत आहे. तो इंग्लंडला गेला आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाला नसीमकडून खूप आशा होत्या. मात्र आता तो आजारी असल्याने पाकिस्तान संघासाठी ही मोठी समस्या आहे. नसीमने आशिया चषक २०२२ मध्ये दमदार कामगिरी केली होती.

आशिया चषक २०२२ मध्ये भारत-पाक पहिला सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील आली होती. उर्वशी आणि नसीम शाहचा या मॅचनंतर हसतानाचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून नसीम शाह अभिनेत्री ऊर्वशी रौतेलाचा क्रश आहे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या