23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडानवदीप सैनी दुखापतग्रस्त; न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यांना मुकणार

नवदीप सैनी दुखापतग्रस्त; न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यांना मुकणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंचे दुखापतीचे सत्र सुरूच आहे. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेला मुकणार असे समोर आले असताना आता युवा गोलंदाज नवदीप सैनी यालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे तो न्यूझिलंड आणि भारत ‘अ’ संघाच्या सामन्यांना मुकणार आहे. भारताचा ‘अ’ संघ न्यूझिलंडच्या ‘अ’ संघाशी २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून संजू संघाचं नेतृत्व करणार आहे. या संघात सैनी देखील होता पण आता दुखापतीमुळे तो या सामन्यांना मुकणार आहे.

मोहम्मद शमीला कोरोनाची बाधा झाल्याचे तसेत सैनीच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने अधिकृत ट्विट केले आहे. यावेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी उमेश यादव संघात सामिल झाल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच सैनीबद्दल माहिती दिली असून यात म्हटले आहे की, नॉर्थ झोन आणि साऊथ झोन यांच्यातील दुलीप करंडकमधील उपान्त्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सैनीला दुखापत झाली. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित स्पर्धेतून तसेच भारत आणि न्यूझिलंड ‘अ’ संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या