24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडानीरज चोप्रा वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र

नीरज चोप्रा वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पात्रता फेरीसाठी २४ वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता.

भाला फेकण्यासाठी सर्वांत पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.
जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३.५० मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेदेखील अंतिम फेरी गाठली.

नुकतेच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदक जिंकत नवे राष्ट्रीय रेकॉर्ड केले. नीरज चोप्राने ८९.९४ मीटर अंतर पार केले. ऑगस्ट २०१८मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याने ८५.७३ मीटर अंतरावर भाला फेकला होता.

तसेच तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावले. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने ८६.३० मीटर अंतर गाठत सुवर्णपदकाची कमाई केली.

फिनलंडमधील या दोन्ही स्पर्धांमधील कामगिरीमुळे नीरजच्या हंगामाला सकारात्मक सुरुवात झाली. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे क्युर्टानेच्या स्पर्धेतील तिस-या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या