18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडानीरज चोप्राचा नवीन लूक

नीरज चोप्राचा नवीन लूक

एकमत ऑनलाईन

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नीरज चोप्रा हा खेळांव्यतिरिक्त, टीव्ही शो, अभिनय आणि आता फॅशनच्या जगातही आपले पाऊल टाकताना दिसायला लागला आहे. चर्चेत असलेला नीरज चोप्रा काही दिवसांपासून एका मॅग्झिनचे फोटोशूट करताना दिसत आहे.

आता नीरजने आणखी एक नवे फोटोशूट केले आहे. त्याने ‘द मॅन’ या नवीन मॅग्झिनसाठी लेटेस्ट फोटोशूट केले आहे. सूट, ट्रेंच कोट आणि स्टायलिश ग्लासेसमध्ये दिसणारा नीरज मोठ्या मॉडेल्सना टक्कर देत आहे. तर एकीकडे मॅग्झिनने इन्स्टाग्रामवर नीरज चोप्राचे नवीन फोटोशूट शेअर करत नीरज चोप्रा ‘हा सुपरमॉडेल आहे की सुपरस्टार?’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात येणा-­या मॅग्झिनच्या कव्हर पेजवर भारताचा गोल्डन बॉय, क्रीडा क्षेत्रात प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करणारा नीरज चोप्रा पाहायला मिळणार आहे.

नीरज चोप्राने या मॅग्झिनच्या फोटोशूटसाठी रेमंड सूट आणि ट्रेन्च कोट घातला आहे. यासोबतच त्याने टायटन्स एज मॅकेनिकल घड्याळही घातले आहे. या संपूर्ण लूकमध्ये नीरज एकदम वेगळा दिसत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या