20 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्रीडा रंगणार नवीन थरार : आयसीसीकडून वर्ल्ड सुपर लीगची घोषणा

रंगणार नवीन थरार : आयसीसीकडून वर्ल्ड सुपर लीगची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. आता कसोटी मालिकेनंतर ट्वेंटी-२०, त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कसोटी व ट्वेंटी-२० मालिका, इंडियन प्रीमिअरं लीग ( आयपीएल) या सर्व स्पर्धा लागोपाठ होणार आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगची घोषणा केली.

२०२३ चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि त्यासाठीच्या पात्रता स्पर्धेची घोषणा आज आयसीसीनं केली. आयर्लंड आणि विश्वविजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणा-या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरूवात होणार आहे. इंग्लंडचा संघ आयर्लंडशी तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाºया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ यांना विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे.

पुढील तीन वर्षांसाठी होणाºया वन डे क्रिकेट सामन्यांतून २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील उर्वरित संघ ठरणार आहेत. तसेच मागील आठवड्यात आम्ही २०२३ चा वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पात्रता स्पर्धांना अधिक वेळ मिळणार आहे, असे आयसीसीच्या जॉफ अ‍ॅलार्डिस यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण १३ संघ सहभागी होणार आहेत. २०१५-१७ च्या वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग जिंकणाºया नेदरलँड्ससह या स्पर्धेत आयसीसीच्या १२ सदस्यीय संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात तीन सामन्यांची प्रत्येकी ४-४ मालिका खेळतील. यातून दोन संघच वर्ल्ड कप खेळू शकतील. प्रत्येक संघाला विजयासाठी १० गुण, तर बरोबरी किंवा अनिर्णित किंवा रद्द झालेल्या सामन्यातासठी प्रत्येकी ५-५ गुण दिले जातील. आठ मालिकांमधील गुणांनुसार संघांची क्रमवारी ठरवण्यात येईल.

Read More  औरंगाबादमध्ये थरार….घराखाली गप्पामारत थांबल्याने भांडण गेले टोकाला….!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या