21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडान्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद

न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद

एकमत ऑनलाईन

साऊथम्पटन : अचूक रणनिती, खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती याच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. दुस-या डावात भारताची घसरगुंडी झाली. याचाच फायदा घेत न्यूझीलंडने ऐतिहासिक विजय मिळविला.

नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुस-या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकांत १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी चहापानापर्यंत सावध सुरुवात केली. चहापानानंतर विराटने अश्विनच्या हातात चेंडू सोपवला. त्याने सलामीवीर टॉम लॅथमला ९ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वेलाही अश्विनने पायचित केले. त्यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी एकेरी दुहेरी, मध्येच चौकार असा मेळ घालत भारताच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. ३१ व्या षटकात चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरला जीवदान दिले. तेव्हा टेलर २७ धावांवर खेळत होता.

विल्यमसन आणि टेलरने ३६ व्या षटकात आपली अर्धशतकी भागीदारी आणि ३७ व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. यानंतर दोघांनी विजयासाठी धावांचे अंतर कमी करत भारतावर दबाव वाढवला. दरम्यान विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले. रॉस टेलरने विजयी चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ५२ तर टेलरने ६ चौकारांसह ४७ धावांची मौल्यवान खेळी केली.

इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या