22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडानिलंगा मॅरेथॉन ग्रुपचा अल्ट्रा हिल हाफमध्ये विक्रम

निलंगा मॅरेथॉन ग्रुपचा अल्ट्रा हिल हाफमध्ये विक्रम

एकमत ऑनलाईन

निलंगा : सातारा इथे नुकत्याच झालेल्या अल्ट्रा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत निलंगा मॅरेथॉन ग्रुपने विजयी झेंडा फडकवत विक्रम करून एक सिल्व्हर व सात ब्रॉझ मेडल पटकावत निलंग्याचा नावलौकिक केला आहे. निलंग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम निलंगा मॅरेथॉन ग्रुपने केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे . या मॅरेथॉनमध्ये भारतातील विविध राज्यातील तब्बल ८ हजार रनर्सनी सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन साता-यातून पोलीस परेड ग्राउंडपासून ते जग प्रसिद्ध कास पठारच्या घाटापर्यंतचे अंतर होते. सुरुवातीचे १०.५ किमी घाटातील तीव्र चढ व नंतर १०.५ किमी तसाच उतार असे एकूण २१ किमी रंिनग करून दिलेल्या कट ऑफ टाईमच्या आत ही स्पर्धा पूर्ण करायची होती.

गोल्ड मेडलसाठी दोन तासाचा कट ऑफ टाईम, सिल्व्हर मेडल साठी २:३० तासाचा कट ऑफ टाईम तर ब्रॉंझ मेडल साठी ४ तासाचा कट ऑफ टाईम वेळेची मर्यादा घालून दिली होता. त्यात निलंगा मॅरेथॉन ग्रुप मधून डॉ नितेश लंबे यांनी सील्व्हर मेडल पटकावले तर महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील शिक्षक राजकीरण बिराजदार यांनी सिल्व्हर मेडल केवळ १:२५ २१ किमी अंतर २:३१ मिनिटे २५ सेकंदात पूर्ण करून पटकावले. तर डॉ सुनील लंगोटे, डॉ सचिन जाधव, गणेश एखंडे, डॉ भीम खलंगरे, डॉ सचिन बसुदे व हरिविजय सातपुते यांनी ३ तासाच्या आत आपला बेस्ट टाईम देत आव्हान पूर्ण केल्याने त्यांना ब्रॉंझ
मेडल मिळाले. या यशाबद्दल निलंगा मॅरेथॉन ग्रुपचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या