36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeक्रीडालोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह

लोकांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड नाही : बीसीसीआय सचिव जय शाह

एकमत ऑनलाईन

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने मंगळवारी घेतला. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा केव्हा व कुठे, याची चाचपणी सुरू झाली आहे. देशातील कोरोना परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय वेळापत्रक लक्षात घेता उर्वरित स्पर्धा पुढील सहा महिने तरी खेळवली जाईल, याची शक्यता कमीच आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी एक खेळाडू अन् चेन्नई सुपर किंग्जच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य यांना कोरोना लागण झाल्यानंतर हा निर्णय येणे अपेक्षित होतेच. त्यामुळे या लीगमध्ये खेळणा-या प्रत्येक खेळाडूची व संबंधित सर्व व्यक्तींची सुरक्षा, हे आमचं प्राधान्य आहे, असे मत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्यक्त केले.

शाह यांनी सांगितले की, देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कॉन्सिलने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू, स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, कर्मचारी, सामनाधिकारी, प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत आम्हाला कोणतीच तडजोड करायची नाही.

स्वदेशीच एकमेव उपाय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या