18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाआता रंगणार क्वालिफायरची लढत

आता रंगणार क्वालिफायरची लढत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आता सर्वांना वेध लागले आहेत ते आयÞपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांचे. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये दोन क्वॉलिफायर आणि एक एलिमिनेटर असे तीन सामने होणार आहे, त्यानंतर आयपीएलची अंतिम फेरी कोणांमध्ये रंगेल, हे स्पष्ट होणार आहे. हे तीन सामने आता कोणत्या संघांमध्ये होणार आहे, याची उत्सुकता सर्वांना असेल. आरसीबीच्या संघाने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यावर आता प्ले-ऑफचे समीकरणही स्पष्ट झाले आहे.

प्ले-ऑफमधील पहिली लढत ही दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये शनिवारी होणार आहे. या सामन्याला क्वॉलिफायर-१ असे म्हटले जाईल. आयपीएलच्या गुणतालिकेत पहिले दोन संघ या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले जातील. त्यामुळे या सामन्यात जो संघ विजयी ठरणार आहे, त्यांना थेट आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल, त्याला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी असेल. कारण या सामन्यात पराभूत झालेला संघ हा क्वॉलिफायर-२ या सामन्यासाठी पात्र ठरेल. पण त्यापूर्वी इलिमिनेटरचा सामना होणार आहे. हा एलिमिनेटरचा सामना गुणतालिकेतील तिस-या आणि चौथ्या संघात होईल. त्यामुळे या सामन्यात आता आरसीबी आणि केकेआर हे दोन संघ खेळतील.

या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. हा एलिमिनेटरचा सामना ११ ऑक्टोबरला रंगणार आहे. एलिमिनेटरमध्ये जो संघ विजयी होईल, त्यांना क्वॉलिफायर-२ या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. क्वॉलिफायर-२ हा सामना १३ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या क्वॉलिफायर-२ या सामन्यात जो संघ विजयी ठरेल, त्यांना आयपीएलच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल, त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे आता १०, ११ आणि १३ ऑक्टोबरला आयपीएलच्या प्ले-ऑफचे सामने होणार आहेत, तर आयपीएलची अंतिम फेरी ही १५ ऑक्टोबरला रंगणार असून चाहत्यांची उत्सुकता आता वाढेलली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या