16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडाबेन स्टोक्ससाठी एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे - प्रशिक्षक मॅथ्यू मॉटची खुली ऑफर

बेन स्टोक्ससाठी एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे – प्रशिक्षक मॅथ्यू मॉटची खुली ऑफर

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : भारतात पुढच्या वर्षी खेळल्या जाणा-या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटच्या निवृत्तीतून माघार घेणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र निवृत्तीनंतरही बेन स्टोक्ससाठी एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे असल्याची ऑफर प्रशिक्षक मॅथ्यू मॉटनी दिली आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत इंग्लंडच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सने नाबाद ५३ धावांची खेळी केली.

दरम्यान, २०१९ मध्ये इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले होते. तेव्हाही बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. न्यूझिलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात स्टोक्सने नाबाद ९२ धावांची खेळी साकारली होती. यामुळे आगामी एकदिवसीय विश्वचषकात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचा आधारस्तंभ म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. पण ज्यावेळी स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा प्रशिक्षक मॅथ्यू मॉटने त्याच्यासाठी कधीही एकदिवसीय संघाचे दरवाजे उघडे असल्याची त्याला ऑफर दिली होती.

बेन स्टोक्सने याचवर्षी जुलै महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वर्कलोडचे कारण देत त्याने एकदिवसीय कारकीर्दीला पूर्णविराम लावत असल्याची घोषणा केली. मेलबर्नमध्ये पत्रकाराशी बोलताना मॅथ्यू मॉट म्हणाले की, ‘‘जेव्हा त्याने मला त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले, तेव्हा मी त्याच्या कोणत्याही निर्णयाचे समर्थन करणार नाही असे सांगितले. त्याला निवृत्त होण्याची गरज नाही.

त्याने काही काळ एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी. मी त्याला म्हणालो की, तो कधीही एकदिवसीय क्रिकेटच्या निवृत्तीमधून माघार घेऊ शकतो. पण हा त्याचा निर्णय असेल. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आम्ही टी-२० क्रिकेटकडे दुर्लक्ष करणार आहोत. पण स्टोक्सने निवृत्तीतून माघार घ्यायची की नाही, हा त्याचा निर्णय असेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या