24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न

एकमत ऑनलाईन

खेळाडूंनी खेळातून आपले करिअर घडवावे : मुख्याधिकारी देविदास जाधव
सेलू : परभणी जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी नूतन विद्यालय सेलू येथे संपन्न झाली.

याप्रसंगी नगर परिषद सेलूचे मुख्याधिकारी देविदास जाधव म्हणाले की, खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे. यातून आपले करिअर घडवावे. खेळातून बौद्धिक, शारीरिक, सामाजिक विकास साधतो, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहभागी स्वामी रामानंद तीर्थ व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण सोळंके, गिरीश लोडाया, माजी व्हॉलिबॉल खेळाडू एस. आर. पी. मास्टर शेख अखिल, राज्य चिटणीस गणेश माळवे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ धनंजय भागवत, पालम ता. क्रीडा संयोजक मोतीराम शिंदे, जिल्हा सचिव सतीश नावाडे, शेख सिकंदर, राठोड सर, अश्विन केदारे, आदी उपस्थित होते. स्पर्धेस माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू संदिप लहाने यांनी भेट दिली.

टेनिस व्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने २४व्या राज्य सब ज्युनियर व ज्युनियर मुले- मुली टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा चिखली (जि. बुलढाणा) येथे दिनांक २३ ते २५ सप्टेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहेत. याकरिता परभणी जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल संघाची निवड करण्यात आली. सदरील संघाची निवड निवड समिती सदस्य मोतीराम शिंदे, शेख सिकंदर, निलेश माळवे, सिध्दांत लिपने, राजेश राठोड, यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या