31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडादसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

एकमत ऑनलाईन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नईला अखेर आज विजय गवसला. बंगळूरवर त्यानी आठ गडी राखून सहज विजय मिळविताना त्यांना जर-तरच्या समीकरणात त्यानी आपले आव्हान जिंवत राखण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रातर्फे खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने दसरादिनी आयपीएल स्पर्धेत चेन्नईकडून अर्धशतकी खेळी करत जोरदार सीमोल्लंघन केलं.चेन्नईसाठी यंदा प्लेऑफच्या आशा मावळल्या असल्या तरी ऋतुराजच्या खेळीने चेन्नईच्या चाहत्यांना विजयाची भेट दिली. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने 22 सप्टेंबरला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी दिली होती. मात्र त्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले आणि ते पराभवाच्या गर्तेत सापडले.तरुणांनी चमक दाखवली नाही असं महेंद्रसिंग धोनी काही दिवसांपूर्वी म्हणाला होता.

ऋतुराजने अर्धशतकी खेळी करत तो चेन्नईच्या भविष्यातील योजनांचा भाग असू शकतो याचे संकेत दिले., 0,५,0 अशी खराब सुरुवात झालेल्या ऋतुराजवर टीकाही झाली होती. . ऋतुराज यंदाच्या आयपीएलमधील एक युवा खेळाडू होता. कोरोनाच्या संसर्गामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. यानंतर त्याला अखेर आज सूर गवसला. त्याने चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद (६५)अर्धशतकी खेळी केली. षटकार ठोकूनच त्याने चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले व टीकाकाराना प्रत्युत्तर दिलं.

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा विराट कोहली चा डाव फलंदाजानी फोल ठरवला प्रथम फलंदाजी करताना बंगळूरूने २० षटकांत ६ बाद १४५ धावांचीच मजल मारली. विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्स यांच्या फलंदाजीमुळे बंगळूरला किमान आव्हान उभारण्याचा दिलासा मिळाला. चेन्नईसाठी पुन्हा एकदा सॅम करन धावून आला. या वेळी त्याने गोलंदाजीत चमक दाखवली. त्याने १९ धावांत ३ गडी बाद केले. कोहलीने ४३ चेंडूत ५०, डिव्हिलर्सने ३६ चेंडूंत ३९ धावांची खेळी केली. या जोडीने ८२ धावांची भागीदारी केली. चेन्नईच्या गोलंदाजांनी आज अखेरच्या टप्प्यात अचूक मारा केला. त्यांनी शेवटच्या तीन षटकांत फक्त २० धावा दिल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज आणि अंबाती रायुडू (२७ चेंडूंत ३९) यांच्यात ५० चेंडूंतील ६७ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईचा विजय सुकर झाला. त्यामुळे अर्ध्या वाटेत रायुडू बाद झाल्यानंतरही ऋतुराज, धोनी जोडीला आरामात चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. चेन्नईने १८.४ षटकांतच २ बाद १५० धावा केल्या. यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकाचा वाटा होता.चेन्नईचे या विजयाने ८ गुण झाले आहेत. त्यांचा आता पंजाब व कलकत्ता विरुद्ध एकेक सामना बाकी आहे. त्यानंतर त्यांच्या बाहेर जाण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. बंगळुरूला मात्र मुंबई दिल्ली हैदराबादशी खेळावयाचे असून त्यातील एक विजयही प्ले ऑफ साठी पुरेसा आहे

अष्टपैलू बेन स्टोक्सचे नाबाद शतक आणि त्याला संजू सॅमसनकडून मिळालेली सुरेख साथ याच्या जोरावर राजस्थानने “स्टोक्स फुल”विजय मिळविला. त्यांनी गुण तक्त्यात आघाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून पराभव केला अबुधाबी च्या मैदानावर पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली हवामान सेट करताना करताना हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सला ५ बाद १९५ धावांची मजल मारता आली होती. मुंबईचा डाव दोन भागीदारींच्या जोरावर उभारला गेला. क्विंटॉन डी कॉक लवकर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या.

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

पण, डावाच्या मधल्या षटकांत ही जोडी फुटली त्यानंतर ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि किएरॉन पोलार्ड हे आक्रमक फलंदाज झटपट बाद झाले. त्या वेळी त्यांच्या डावातील दुसरी महत्वाची भागीदारी झाली. हार्दिक पंड्या आण सौरभ तिवारी यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांचा तडाखा दिला. त्यानंतर हार्दिकने भाऊ कृणालच्या साथीत ११ चेंडूंत ३० धावा जोडल्याने पावणेदोनशेत अडकू शकणारा मुंबईचा डाव दोनशेच्या जवळ पोचला. हार्दिक पंड्याने २१ चेंडूंत आपली नाबाद ६० धावांची खेळी सजवताना २ चौकार आणि सात षटकार लगावले.आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरवात आक्रमक होती. त्यानंतरही त्यांच्या दोन विकेट झटपट पडल्या. विशेष म्हणजे सलामीची जोडी १३ धावांवर फुटली तेव्हा स्टोक्सने खातेही उघडले नव्हते. अर्थात, त्याला खेळायला एकही चेंडू मिळाला नव्हता. पण, खेळण्याची संधी मिळाल्यावर स्टोक्सने आपल्या स्ट्रोक्सफुल फलंदाजीने मुंबईच्या गोलंदाजांना हैराण केले. अगदी त्यांचे प्रमुख अस्त्र असलेला बुमरा देखील त्याला रोखू शकला नाही.

कर्णधार स्मिथ (११) लवकर बाद झाला. त्याची जागा घेणाऱ्या संजू सॅमसनला या वेळी सूर गवसला आणि त्याने स्टोक्सला सुरेख साथ केली. या जोडीने ८२ चेंडूंत १५२ धावांची नाबाद भागीदारी केली. स्टोक्सने एका हाती खेळ करून विजय साजरा केला. त्याने ६० चेंडूंत १४ चौकार आणि तीन षटकांरासह नाबाद १०७ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स २६ वर असताना सहाव्या षटकात कुणालच्या गोलंदाजीवर स्टॉकसचा स्विप हार्दिक पांड्या ला झेलता आला नाही मुंबईला हा सोडलेला झेल फारच महाग पडला. आणि सामन्याचा निकालच बदलला. सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या.त्यानंतर राजस्थान रॉयल्सने १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळविला. राजस्थानचे बारा सामन्यानंतर दहा गुण झाले आहेत त्यांना पंजाब आणि कलकत्ता यांच्याशी दोनच सामने खेळावयाचे आहेत ते दोन्ही सामने जिंकावयास लागतील तरच प्ले ऑफ मध्ये संधी मिळेल. मुंबईने आणखी एक विजय मिळवला की ते प्ले ऑफ मध्ये प्रवेश करतील त्यांचे बारा सामन्यानंतर सात विजयासह चौदा गुण झाले आहेत तर धावगती मध्येही ते एक नंबर (+१.२५२)ला आहेत त्यामुळे पहिल्या चारातील स्थान निश्चित आहे

डॉ.राजेंद्र भस्मे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या