31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्रीडा नियमांनुसार खेळायचे असेल तरच या

नियमांनुसार खेळायचे असेल तरच या

एकमत ऑनलाईन

ब्रिस्बेन : ब्रिस्बेन येथे होत असलेली चौथी कसोटी सिडनीत खेळवली जाण्याची शक्­यता खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेच व्यक्त केली आहे. सिडनीतच तिसरी कसोटी झाल्यानंतर ही कसोटी खेळवली जाणार असल्याचे संकेत आहेत. ब्रिस्बेनला कोरोनाबाबतचे नियम जास्त कठोर असल्याने भारतीय संघाने तेथे जाण्यास नकार दिला असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतर क्वीसलँड सरकारच्या वतीने भारतीय संघाच्या भूमिकेवरुन वादग्रस्त विधान करण्यात आले आहे

ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्याने भारतीय संघास धमकीवजा इशारा दिला आहे.
क्वीसलँडच्या शेडो आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी ऑस्ट्रेलियन चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय संघाला इशारा दिला आहे़ त्यांनी म्हटले आहे की, भारतीय संघाला नियमाप्रमाणे खेळायचे नसेल तर त्यांनी इकडे ब्रिस्बेनमध्ये येऊच नये. ते पुढे म्हणतात, येथे भारतीय संघाला नियम पाळावेच लागतील, यामध्ये कोणतेही बदल किंवा दुर्लक्ष केले जाणार नाही. येथे येणा-या प्रत्येक व्यक्तीला नियमाचे पालन करावेच लागेल, याला दुसरा पर्याय नाही. सर्वांना एकसारखेच नियम आहेत, असा उल्लेखही केला आहे. त्यांनी याबाबतीत एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात या प्रकरणावरुन वाद निर्माण होऊ शकतात. दरम्यान, येत्या गुरुवारपासून तिसरी कसोटी सिडनीत सुरू होणार आहे. हा सामना पूर्ण होण्यापूर्वीच चौथ्या कसोटीबाबतची अधिकृत घोषणा होण्याचीही शक्­यता आहे. चौथ्या सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. कोरोना तसेच विलगीकरणाबाबतचे ब्रिस्बेनमधील नियम अतिशय कठोर आहेत.

पुरीच्या जगन्नाथ मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; आता कोरोना सर्टिफि केटच्या अटीवरच होणार दर्शन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या