22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeक्रीडापी. व्ही. सिंधू साजरा करतेय २७ वा वाढदिवस

पी. व्ही. सिंधू साजरा करतेय २७ वा वाढदिवस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतासाठी अनेक विक्रम करणारी भारताची शटलर पी. व्ही. सिंधू आज तिचा २७वा वाढदिवस साजरा करीत आहे. वयाच्या २७व्या वर्षी तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पी. व्ही. सिंधूने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप जिंकण्यापासून तर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताचा झेंडा फडकावला.

ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिने २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये हे रौप्यपदक जिंकले आहे. त्यानंतर तिने ऑलिम्पिक २०२२ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकून देशाचे नाव मोठे केले.

बीडब्ल्यूएफ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय एकेरी खेळाडू आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा तिने २१-७, २१-७ असा पराभव केला होता. हे सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी तिने २०१७ आणि २०१८ मध्ये या स्पर्धेत संयुक्त रौप्यपदक जिंकले होते.

वर्ल्ड टूरचा अंतिम सामना जिंकणारी पहिली भारतीय
पी. व्ही. सिंधूने बीडब्ल्यूएफच्या वर्ल्ड टूरचा अंतिम सामना जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०१८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी तिने अशी कामगिरी करून दाखवली होती. त्यावेळी तिने नोझोमी ओकुहाराचा २१-१९, २१-१७ असा पराभव केला होता.

सर्वाधिक वेळ वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचा विक्रम
पी. व्ही. सिंधूच्या स्टॅमिनाबद्दल नेहमीच चर्चा होते. दरम्यान, २०१७ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप दरम्यान तिने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ अंतिम सामना खेळला.

भारतासाठी पाच जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी पहिली महिला
भारतीय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू एकमेव भारतीय आहे. तिने सुवर्णपदक (२०१९), रौप्यपदक (२०१२ आणि २०१८), कांस्यपदक (२०१३ आणि २०१४) जिंकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या